माजी सैनिकांसाठी डीएससी साठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भरतीमध्ये केवळ मराठा इन्फन्ट्रीतून निवृत्त झालेले जवान भाग घेऊ शकतात. सोल्जर सामान्य सैनिक व क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे.
army soldier
army soldierSakal

बेळगाव - येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे माजी सैनिकांसाठी डिफेन्स सर्व्हिस कोर्प्स (डीएससी) (DSC) साठी सैन्य भरती मेळाव्याचे (Army Recruitment Campaign) आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ सप्टेंबर रोजी मराठा केंद्रात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

भरतीमध्ये केवळ मराठा इन्फन्ट्रीतून निवृत्त झालेले जवान भाग घेऊ शकतात. सोल्जर सामान्य सैनिक व क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे. माजी सैनिकाची सैन्यातील सेवानिवृत्ती उत्तम असावी. त्याच्या संपूर्ण सेवा काळातील पुस्तकात दोनहुन अधिक लाल शेरा नसावा. सैन्यात त्याने किमान पाच वर्षे सेवा बजावलेली असावी. तसेच त्याची सेवानिवृत्ती नियमानुसार झालेली असावी. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावेत. सामान्य सैनिक पदासाठी उमेदवारांचे वय ४६ वर्षापेक्षा कमी असावे तर क्लार्क पदासाठी ४८ वर्षाखालील असावेत.

army soldier
निपाणीत गणेशोत्सव करणारच!

भरतीच्या ठिकाणी उमेदवाराने आपले डिस्चार्ज बुक (सेवा पुस्तक), शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल, जात प्रमाणपत्र, डोमीसाईल प्रमाणपत्र, गाव सरपंच किंवा पोलीस पाटीलकडून मिळविलेले वर्तणुक प्रमाणपत्र, कुटुंबियातील सर्व सदस्यांसोबतचा फोटो, त्यावर सदस्यांची नावे, संबध, जनतारीख असावी. तसेच फोटोवर गाव सरपंचाची सही व शिक्का असावा. आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, सर्व प्रमानपत्रांचे दोन झेरॉक्स संच, स्वतःचे पासपोर्ट आकाराचे १२ रंगीत फोटो, मराठा प्रदेशील सेनेतील माजी सैनिक असल्यास आपल्या रेकॉर्ड अधिकारीचे प्रमाणपत्र, पोलीस अधिक्षकांकडून मिळविलेले वर्तणुकीचे प्रमाणपत्र घेऊन १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मराठा इन्फन्ट्रीत हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com