आमच्या पोरी पळाल्या हो.. त्यांना सापडून आणा, पोलिसांकडे पालकांची आळवणी

our girls are running away
our girls are running away
Updated on

अकोले : तालुक्‍यातील लिंगदेव व धामणगाव पाट येथील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या बाबत अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

लिंगदेव येथील दहावीत शिकणारी मुलगी रविवारी (ता. एक) सायंकाळी सातच्या सुमारास घरात काहीही न सांगता निघून गेली. अज्ञात कारणासाठी कोणीतरी तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली.

दुसऱ्या घटनेत धामणगाव पाट येथील 16 वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा प्रकार प्रेमातून झाला की अन्य कोणत्या कारणातून हे समजू शकले नाही. अकोले तालुक्यात अलिकडे मुली पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पोलिसदादा, आमच्या पोरी पळून गेल्या आहेत. जरा कृपा करून त्यांना शोधा असा धोशा या महिलांच्या पालकांनी पोलिसांकडे लावला आहे. इंदोरीकर महाराज अकोले तालुक्यातील आहेत. मुलींवर मोबाईलमुळे विपरित परिणाम होत आहे. याचा दाखला ते आपल्या कीर्तनातून देतात. मुलींनो तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. मात्र, तुम्ही पळून जाऊ नका, असा सल्ला देतात.

घर सोडून गेलेल्या या मुली अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांना पळवून नेणार्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com