उद्रेक... बेघर केंद्रात 52 ; जिल्ह्यात उच्चांकी 76 रुग्ण...जिल्ह्यात कहर महापालिका क्षेत्रात 69 रुग्णांसह ग्रामिण भागालाही कोरोनाचा वाढता विळखा 

घनशाम नवाथे
Wednesday, 15 July 2020

सांगली- महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामिण भागाला कोरोनाचा विळखा घट्टच होत चालला असून आज केवळ सांगली शहरात 69 कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी तब्बल 52 रुग्ण एकट्या महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रात आढळले. शहरासाठी हा मोठा धक्का असून उत्तर शिवाजीनगरचा संपुर्ण परिसर संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. सांगलीसह दिवसभरात आत्तापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी 76 रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. मिरजेतील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेली औरवाड (ता.शिरोळ, कोल्हापूर) येथील 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

सांगली- महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामिण भागाला कोरोनाचा विळखा घट्टच होत चालला असून आज केवळ सांगली शहरात 69 कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी तब्बल 52 रुग्ण एकट्या महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रात आढळले. शहरासाठी हा मोठा धक्का असून उत्तर शिवाजीनगरचा संपुर्ण परिसर संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. सांगलीसह दिवसभरात आत्तापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी 76 रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. मिरजेतील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेली औरवाड (ता.शिरोळ, कोल्हापूर) येथील 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

सांगलीसाठी आजचा दिवस हादरा देणारा ठरला. दुपारी दोनच्या सुमारास निवारा केंद्राचा आकडा सोशल मिडियावरून व्हायरल झाला आणि शहरावर आज चिंतेचे ढग अधिकच गडद झाले. महापालिकेच्यावतीने बेघर निराधारांसाठी इन्साफ फौंडेशनच्या माध्यमातून उत्तर शिवाजीनगरातील आपटा पोलिस चौकीजवळील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत सावली बेघर निवारा केंद्र चालवले जाते. चार दिवसापुर्वी तेथे एक रुग्ण निष्पन्न झाला होता. त्यानंतर संपर्कातीस सर्वांच्या तपासण्यांचे धक्कादायक निष्कर्ष आज मिळाले.

एका केंद्रातच तब्बल 52 जण "कोरोना' बाधित असल्याचे स्पष्ट झाले. एकाच ठिकाणी इतकी मोठी संख्या ही प्रथमच आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. केंद्रातील 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी 48 रूग्ण आणि चार कर्मचारी अशा एकुण 52 जण बाधीत झाल्याचा अहवाल दुपारी प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पॉटवर धाव घेतली. रूग्णाच्या संपर्कातील इतर 22 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला. 
दरम्यान सांगलीतील कुदळे प्लॉट येथे तीन रुग्ण आढळले. सांगलीवाडीत आज कोरोनाचा प्रथमच शिरकाव झाला आहे. मिरज रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्‍टरला देखील कोरोना झाला आहे. तर मिरजेत आणखी पाच रूग्ण आढळले. त्यामध्ये मंगळवार पेठ आणि कमानवेस येथील रूग्णाचा समावेश आहे. कोरोना बाधित रूग्णांमध्ये 24 वर्षाचे दोघे, पंचविशीतील एक आणि 26 वर्षाचे दोघेजण आहेत. 
कडेगाव तालुक्‍यात मंगळवारी आठ रूग्ण आढळले होते. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी चार रूग्ण आढळले. त्यामध्ये शाळगाव, येतगाव, हिंगणगाव खुर्द आणि तडसर येथे प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. नागठाणे (ता. पलूस) येथे 18 वर्षाच्या युवकास कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. नागठाणे येथे 62 वर्षीय वृद्धाचा नुकतेच मृत्यू झाला. या वृद्धाच्या संपर्कातून युवकास कोरोना झाला आहे. पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथील 70 वर्षाचा वृद्ध, सांडगेवाडी (ता. पलूस) येथील 35 वर्षाचा तरूण आज "कोरोना' बाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. 
जिल्ह्यात दिवसभरात "कोरोना' बाधित रूग्णांनी पाऊणशतक गाठले. तसेच आज 30 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत 22 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यापैकी सातजण "व्हेंटिलेटर' वर आहेत. मिरजेतील कोविड रूग्णालयात परजिल्हा व राज्यातील 43 रूग्ण देखील सध्या उपचार घेत आहेत. त्यातील औरवाडच्या महिलेचा मृत्यू झाला. 

निवारा केंद्रातच उपचार होणार- 
बेघर केंद्रात आज 52 कोरोना बाधित आढळल्यानंतर संबंधितांवर केंद्रातच उपचार केले जाणार आहेत. या रूग्णांपैकी चिंताजनक प्रकृती असलेल्या रूग्णांवर मिरजेतील कोविड रूग्णालयात उपचार केले जातील असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी "सकाळ' ला सांगितले. 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 780 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 352 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 405 
  • आजअखेरचे मृत- 23 
  • चिंताजनक रूग्ण- 22 
  • ग्रामीण भागातील रूग्ण- 519 
  • शहरी भागातील रूग्ण- 68 
  • महापालिका क्षेत्र- 193 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह (आजअखेर)- 
आटपाडी- 60, जत- 97, कडेगाव- 43, कवठेमहांकाळ- 24, खानापूर- 27, मिरज- 46, पलूस- 57, शिराळा- 139, तासगाव- 25, वाळवा- 69, महापालिका- 192 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreak . 52 in homeless center; The highest number of 76 patients in the district