निळवंडे कालव्यांचे काय रं, पाणी येईल तेव्हा खरं... 

सतीश वैजापूरकर 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

शिर्डी : "निळवंडे कालव्यांचे काय बाबा, पाणी येईल तेव्हा खरे,' या उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत प्रचलित असलेल्या म्हणीचा प्रवास आता मावळतीकडे सुरू झाला. या कालव्यांच्या कामाला वेग येऊ लागला. आता राज्यात रखडलेला हा एकमेव प्रकल्प शिल्लक राहिला. त्यामुळे निधीची अडचण नाही. संगमनेर तालुका मोठा लाभार्थी असल्याने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व निळवंडे कृती समितीच्या पाठिशी असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या रेट्याला यश आले, तर अकोले तालुक्‍यात संथ गतीने सुरू असलेल्या कालव्यांच्या कामाला वेग येऊ शकेल.

शिर्डी : "निळवंडे कालव्यांचे काय बाबा, पाणी येईल तेव्हा खरे,' या उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत प्रचलित असलेल्या म्हणीचा प्रवास आता मावळतीकडे सुरू झाला. या कालव्यांच्या कामाला वेग येऊ लागला. आता राज्यात रखडलेला हा एकमेव प्रकल्प शिल्लक राहिला. त्यामुळे निधीची अडचण नाही. संगमनेर तालुका मोठा लाभार्थी असल्याने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व निळवंडे कृती समितीच्या पाठिशी असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या रेट्याला यश आले, तर अकोले तालुक्‍यात संथ गतीने सुरू असलेल्या कालव्यांच्या कामाला वेग येऊ शकेल. तसे झाले तर पुढील दोन ते अडीच वर्षात दुष्काळी लाभक्षेत्राला पाणी मिळू शकेल. 

ठळक बातमी - पुणेकरामुळे दिल्ली भाजप हैराण, परेशान 

काम करून घेण्याचे आव्हान 
अकोले तालुक्‍यात पहिल्या सव्वीस किलोमीटर अंतरातील राजकीय आणि भूसंपादनाचे अडथळे बऱ्यापैकी दूर झाले. गेल्या दहा वर्षांत केवळ पाच किलोमीटर लांबीच्या कालव्याचे काम करून ज्या ठेकेदाराने हा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याच्या विक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्याकडून वेगाने काम करून घेण्याचे आव्हान महसूलमंत्री थोरात यांच्यापुढे आहे. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानंतर अकोले तालुक्‍यातील कालव्यांच्या कामाला थोडासा वेग आला. 
तेथे डोंगराच्या कडेचे, एक किलोमीटर लांबीचे सुमारे वीस कोटी रुपये खर्चाचे कॉंक्रिट कालव्याचे अन्य ठेकेदाराला दिलेले काम, तसेच पहिल्या अडीच किलोमीटरमधील काम वेगाने सुरू आहे. उर्वरित अठरा किलोमीटरमधील अडथळेही दूर झाले. संथ गतीने काम करण्याचा विक्रम करणाऱ्या ठेकेदाराने आता येथे दहा पोकलेनद्वारे एकाच वेळी खोदाई सुरू केली. तेथे रेडी मिक्‍सर प्लॅंट टाकण्याची तयारी सुरू केली. पहिल्या सव्वीस किलोमीटरमध्ये तब्बल 74 बांधकामे आहेत. या कामाचा वेग तिप्पट करावा लागेल, एवढी कामाची गती संथ आहे. 

म्हाळुंगीपर्यंतचे काम पूर्ण 
पुढे पिंपळगाव कोंझिरा येथे बोगद्याचे अस्तरीकरण सुरू आहे. म्हाळुंगी नदीपर्यंतचे कालवे उकरण्याचे काम पूर्ण झाले. म्हाळुंगी व आढळा नदीवरील जलसेतूचे काम झाले. त्यामुळे पुढील दोन ते अडीच वर्षांत नवे अडथळे आले नाहीत, तर कदाचित कालव्याचे पाणी लाभक्षेत्रात येऊ शकेल, अशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली. 

कवठे कमळेश्‍वर बोगदा 
संगमनेर तालुक्‍यातील भूसंपादन खर्च, कॉंक्रिट कालवे करून अडीचशे कोटी रुपयांवरून नव्वद कोटी रुपये खर्चात पूर्ण करण्यात यश आले आहे आणि कुरण ते निळवंडेपर्यंतच्या (कवठे कमळेश्‍वर बोगदा) कालव्याच्या कामालाही वेग आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming the obstacles in the work of the Nilwande Canal