कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन आजपासून बंद

सांगलीत दररोज १० टनाहून अधिक ऑक्सिजनचा तुटवडा; कर्नाटकच्या सूचनेवर केंद्राचा निर्णय
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन आजपासून बंद

सांगली : सांगली जिल्ह्यात (sangli district) कोरोना रुग्ण (covid-19 patients) संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या महिन्यापासूनच ऑक्सिजन (oxygen) मिळवण्यासाठी शासन आणि प्रशासकीय पातळ्यांवर युध्दजन्य परस्थिती असताना कर्नाटकातून (karnataka)गेली २० दिवस सांगली जिल्ह्यासाठी मिळणारा १० टन ऑक्सिजन बंद करण्यात येणार आहे. कर्नाटकातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे राज्यातून महाराष्ट्रातील (maharashtra)काही जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो राज्यातच वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (CM karnataka) केंद्र सरकारकडे (centeral government) केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. यामुळे राज्यातील सांगलीसह कोल्हापूर आणि अन्य काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होवून तुटवडा जाणवणार आहे. शासन आणि प्रशासनाची (local authority) डोके दुखी वाढली आहे.

सांगली जिल्ह्याची रुग्ण संख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढाच राहिलेला आहे. यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकरी यांची चिंता वाढली आहे. गेल्या वीस दिवसापासून सांगली जिल्ह्यासाठी कर्नाटकातील बेल्लारी (bellari)येथून दररोज १० टन ऑक्सिजन दररोज मिळत होता. या शिवाय पुणे येथून दोन टॅंकर मिळत असल्यामुळे दररोज सरासरी ४० टन ऑस्किजनची गरज असताना कशीतरी ३५ टनावर तजवीज होत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणी केंद्र सरकारने तातडीने मान्य केल्याने सांगलीसह काही जिल्ह्यातील परस्थिती गंभीर होणार आहे.

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन आजपासून बंद
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता भाजपाचा टास्क फोर्स

सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी १८३३ कोरोना पॉझिटिव्ह (covid 19 positive)रुग्ण तर जिल्ह्यातील ४४ आणि परजिल्ह्यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती कायम आहे. जिल्ह्यात १ मे रोजी सांगलीतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. त्यावेळी सबंधित काही हॉस्पिटल चालकांनी ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने थेट रुग्णांच्या नातेवाईकांना तसा निरोप देवून रुग्ण हालवावेत, अश्‍या सूचना केल्या होत्या. त्याचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली असली तरी पुन्हा असा प्रसंग उद्भवनारच नाही, असे नाही.

"जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी गेल्या काही दिवसांपासून तारेवरची कसरत सुरुच आहे. गेली वीस दिवस कर्नाटकातून जिल्ह्यासाठी दररोज होणारा १० टनाचा पुरवठा खंडीत होईल, असे केंद्र सरकारने आज स्पष्ट करुन तसा आदेशही काढला आहे. पुन्हा ऑक्सिजन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सरकारच्या प्रयत्नाला नक्की यश येईल."

- नितीन भांडारकर, सहायक आयुक्त, औषध प्रशासन, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com