Sai Paranjpye : पद्मभूषण सई परांजपे यांना भावे गौरव पदक; ५ नोव्हेंबरला होणार वितरण

ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार झाला जाहीर.
sai paranjpye

sai paranjpye

sakal

Updated on: 

सांगली - ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला. मराठी रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याहस्ते वितरण होणार आहे. मानाचे गौरव पदक, ३० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com