Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील
Water Scheme Deadline : पलूस नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहर विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या ३७ कोटींच्या योजनेच्या अपूर्ण कामांसाठी मुदतवाढ देण्याचा ठराव संमत झाला, तर स्मशानभूमी दुरुस्तीसाठी ५५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
पलूस : नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली. ‘‘शहरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, तरीही या योजनेतून शहरास पाणीपुरवठा सुरू आहे. एकूण निधीपैकी ५० टक्के निधी शासनाकडून येणे आहे.