पलूस पालिका वार्तापत्र : महाविकास आघाडीचा प्रयोग की "एकला चलो' 

Palus Palika Newsletter : Mahavikas Aghadi's experiment that 'Let's go alone'
Palus Palika Newsletter : Mahavikas Aghadi's experiment that 'Let's go alone'

पलूस (जि. सांगली)  : पलूस नगरपालिका निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये पालिका निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात येणार की, सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पलूस शहर हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. पलूस पालिका अस्तित्वात आल्यानंतर ता.27 नोव्हेंबर 2016 रोजी प्रथमच निवडणूक झाली. पालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी व काही ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणूक चुरशीने झाली. त्यावेळी कॉंग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि नगरसेवक पदाचे 12 उमेदवार निवडून आले. पालिकेत एकहाती सत्ता कॉंग्रेसने मिळवली. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे 4 तर भाजपचा केवळ 1 उमेदवार निवडून आला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. 

त्यानंतर बरेच राजकीय बदल झाले. राज्यात अनपेक्षितपणे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच पलूस पालिका निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कॉंग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, वसंतराव पुदाले आणि पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते बापूसाहेब येसुगडे यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आगामी पालिका निवडणूक होणार आहे.

पालिका निवडणूक ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधक यांच्यामध्ये राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवणार की, गेलेवेळेप्रमाणे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या सर्वत्र महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना निवडणूक लढवत आहे.

मात्र, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूस मध्ये तशी चर्चा दिसत नाही. कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढेल, असे चित्र आहे. तर पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी ही राष्ट्रवादी किंवा भाजपा यांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार की "एकला चलो' या भूभिकेत राहूनच निवडणूक लढविणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

प्रभाग रचना नवी होणार 
पलूस पालिका निवडणूकिसाठी नवीन प्रभागरचना होणार आहे. एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडायचा आहे. त्यामुळे प्रभाग लहान असतील.त्यामुळे निवडणूकीत आणखी रंगत येणार आहे.

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com