
पलूस : ‘‘पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या जोरदार व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने विजय मिळाला. मात्र, माझ्यासह कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून मिळालेला जनसेवेचा वसा कधीही सोडणार नाही. विकासाची गंगा यापुढेही प्रवाहित राहील. प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम यांनी केले.