सांगली : द्राक्षपंढरी सांगली अशी ओळख गेल्या काही वर्षांत ड्रॅगन फ्रुटच्या (Dragon Fruit) नावानेही तयार होत आहे. यंदा सुमारे ८ हजार एकरांवर लागवड क्षेत्र या फळाखाली आले आहे. या फळाला देशभरातील बाजारपेठ मिळवून देतानाच त्याच्यावर प्रक्रिया करूनही चांगला दर मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी जवळपास तीन हजार लिटर ड्रॅगन वाईन प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात येणार आहे. पलूस येथील वाईनच्या (Wine) मदर युनिटमध्ये ही वाईन तयार करण्यात येणार आहे.