शिवसेनेकडून वीरेंद्र मंडलिक सभापतिपदाचे दावेदार?

- रमेश पाटील
रविवार, 22 जानेवारी 2017

म्हाकवे - कागल तालुक्‍यातील प्रा. मंडलिक व संजय घाटगे गटातील कार्येकर्त्यांचे लक्ष पंचायत समिती सभापती आरक्षणाकडे लागले आहे. २३ जानेवारीला सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. त्यानंतरच दोन्ही गटाअंतर्गत जागा निश्‍चित होतील. सभापती पदाचे आरक्षण खुले झाल्यास वीरेंद्र मंडलिक हे जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीची निवडणूक लढवतील आणि सत्ता आल्यास सभापतिपदाचे प्रमुख दावेदारही असतील, अशी चर्चा आहे. ते पंचायत समितीच्या यमगे किंवा नानीबाई चिखली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्‍यता आहे. सभापती पदाचे आरक्षण अन्य पडल्यास बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते.

संजय मंडलिक व संजय घाटगे यांनी एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या युतीची ही सलग दुसरी जिल्हा परिषद निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती सभापतिपदाची मागणी जाहीरपणे केली. त्यावर चर्चाही झडल्या. त्यानंतर झालेला सभापती पदाचा फॉर्म्युलाही निश्‍चित मानला जातो. सभापती पद खुले राहिल्यास वीरेंद्र मंडलिक पहिल्यांदा अडीचवर्षे सभापतिपदाचे दावेदार तर अन्य आरक्षण झाल्यास सव्वा-सव्वा वर्षे पदाची विभागणी निश्‍चित मानली जाते. 

वीरेंद्र मंडलिकांची पहिलीच निवडणूक
गेल्या चार वर्षात वीरेंद्र मंडलिक यांनी मंडलिक युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कागल तालुक्‍यात संपर्क ठेवला आहे. प्रतिष्ठाणच्या शाखा ६० हून अधिक गावात काढून युवकांना संघटित केले आहे, तसेच हमिदवाडा साखर कारखान्यावर संचालक पदाची संधी मिळाल्यापासून प्रमुख कार्यकर्ते व सभासदांशी देखील त्यांचा चांगला संपर्क वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लढविली जाणारी त्यांची सार्वजनिक जीवनातील ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे.

Web Title: panchya committee chairman selection