
पढरपूर : पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्यच नव्हे तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. मात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यावश्यक असलेला सराव करण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असे एकही क्रीडा संकुल नसल्याने पंढरीतील खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे.