भाजपच्या वाटेवर असणाऱ्या काँग्रेस आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारत नागणे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मागील अनेक दिवसांपासून आमदार भारत भालके हे काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या सुरु होत्या. परंतु आज अखेर काँग्रेसची साथ सोडून आमदार भालकेंनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापू्र्वीच आमदार भालकेंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पंढरपूर : काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून आमदार भारत भालके हे काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या सुरु होत्या. परंतु आज अखेर काँग्रेसची साथ सोडून आमदार भालकेंनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापू्र्वीच आमदार भालकेंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आमदार भारत भालकेंनी 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणुक माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी भालके पराभूत झाले होते. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा रिडालोसकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी मोहिते पाटलांचा दारुन पराभव केला होता.

2014 च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात आमदार भालकेंनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून परिचारकांचा सुमारे आठ हजार मतांनी पराभव केला होता.  आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादीकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंतच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत आमदार भालकेंनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुक लढवली आहे.या निवडणुकीत त्यांना थेट माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढावे लागणार आहे. सुधाकर परिचारक हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तर आमदार भालकेंची देखील राजकारणात कसलेला पैलवान म्हणून ओळख आहे. विधानसभेच्या आखाड्यात कोण कशी मात करुन निवडणुकीचा फंड जिंकतो याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur MLA Bharat Bhalke resigns may be he entered NCP