पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पंढरपूर (सोलापूर) : येथील सरगम चित्रपट गृहा जवळील रेल्वेमार्गावर रेल्वे गाडीची धडक बसून सांगोला येथील कोल्ड्रिंक दुकानदार जहांगीर नबीलाल बागवान (वय 57) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : येथील सरगम चित्रपट गृहा जवळील रेल्वेमार्गावर रेल्वे गाडीची धडक बसून सांगोला येथील कोल्ड्रिंक दुकानदार जहांगीर नबीलाल बागवान (वय 57) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

सरगम चित्रपट गृहा जवळील घटना 
कुर्डूवाडीकडून पंढरपूरमार्गे मिरजकडे जाणारी रेल्वे गाडी सरगम चित्रपट गृहा जवळील रेल्वे मार्गावरून जात असताना ही घटना घडली. मयत व्यक्तीचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन प्राथमिक चौकशी केली असता मयत व्यक्ती जहांगीर नबीलाल बागवान असल्याचे निष्पन्न झाले. हा अपघात आहे की आत्महत्या आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. याप्रकरणी कुर्डुवाडी रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

शरीराचे तुकडे करून पोत्यात भरून रेल्वे रुळावर टाकले 
सोलापूर : आसरा चौकाशेजारी असलेल्या पुलाजवळील रेल्व रुळाशेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आसरा रेल्वेपुला शेजारी मृतदेह आढळला आहे. बारीक बारीक तुकडे करून पोत्यात भरून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महेंद्र माधवदास बुवा असे त्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंद यांनी दिल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेबाबत काही पुरावे सापडतील का याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रेल्वे रूळ परिसरातील सर्वच भागांची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur: Old man dies in train collision