Video : रात्रं-दिवस चालते इथल्या शिवभोजन केंद्रातील पंगत

The pangat at the Shivbhojan Kendra here runs day and night
The pangat at the Shivbhojan Kendra here runs day and night
Updated on

नगर ः राज्यात कोणीही गरीब भुकेला राहू नये, यासाठी ठाकरे सरकारने शिवभोजन सुरू केलं. त्याचा फायदाही लोकांना होत आहे. मात्र, हे भोजन ठराविक वेळेत आणि मोजक्‍याच लोकांना मिळते. लॉकडाउनच काळातही शिवभोजन थाळी पुन्हा सुरू झाली आहे. त्यालाही मर्यादा आहे. मात्र, नगरमधील एका शिवभोजन केंद्रातील पंगत काही संपत नाही.तेथे भोजनाचे अक्षय्य पात्र आहे. सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत पंगत सुरूच असते. पत्रकार चौकाजवळ कृष्णा भोजनालय आहे, तेथे ही पंगत चालते. 

सध्या देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे विद्यार्थी, मजूर जिकडे-तिकडे अडकून पडले आहेत. सर्वच ठिकाणची हॉटेल्स, मेस बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. या लोकांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे, यासाठी दानदाते पुढे आले आहेत. नगरमध्ये कृष्णा भोजनालयामार्फत भुकेल्या लोकांसाठी अन्नदान सुरू आहे. साईनाथ घोरपडे यांनी या अन्नछत्राची जबाबदारी उचलली आहे.

कोणी उपाशी राहू नये यासाठी.. 
लॉकडाउनच्या काळात अनेकांची जेवणाअभावी ससेहोलपट होते आहे. त्यांना दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठी साईनाथ यांनी हा उपक्रम सुरू आहे. त्यांच्या कृष्णा भोजनालयास शिवभोजन केंद्राची मान्यता आहे. त्याद्वारे ते ठरवून दिलेल्या ताटांचे वाटप करतात. मात्र, त्यानंतरही त्यांची ही पंगत संपत नाही. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला आहे. 

देश-विदेशातून मदतीचा ओघ 
हे विद्यार्थी म्हणजे साईनाथ यांच्या मेसचे मेंबर आहेत. आता ते इंग्लंड, अमेरिका, जपान, मुंबई, पुणे, बेंगलुरू अशा विविध देशांत आणि शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांनीही सामाजिक बांधिलकीतून साईनाथ यांना अर्थसाह्य केले आहे. बीसीएस आणि एमसीएस नगरी ग्रुप असे त्यांच्या व्हॉटसऍप ग्रुपचे नाव आहे. त्या ग्रुपमधील प्रत्येकाने आपापल्या परीने वर्गणी जमा करून साईनाथ यांच्या खात्यावर पाठवली. त्या पैशातून साईनाथ गरजू लोकांना मोफत जेवण देत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील रूग्णांचे नातेवाईक, रस्त्यावर फिरणारे भिक्षेकरी, गरजू विद्यार्थी यांना सोशल डिस्टन्स पाळून अन्न पाकिटाचे वाटप केले जाते. या वाटपाचा व्हिडिओ तयार करून संबंधित देणगी देणाऱ्यांना पाठवला जातो. त्यांचे तसे बंधन नाही, परंतु साईनाथ हे पारदर्शकता पाळतात. 

म्हणून ऋणानुबंध 
साईनाथ यांची पार्श्‍वभूमी गरिबीची आहे. ते मूळ पाथर्डी तालुक्‍यातील वैजू बाभळगावचे. शेतकरी संघनेशी निगडित. त्यामुळे ते मेस चालवितानाही सामाजिक बांधिलकी जपतात. आतापर्यंत त्यांच्या दारातून कोणी पैसे नाहीत आणि विन्मुख गेला, असे घडलेले नाही. गेल्या अठरा वर्षांत त्यांच्या मेसमधून तब्बल दीड लाख मेंबर जेवण करून गेले आहेत.

साईनाथ केवळ ग्राहक म्हणून त्यांच्याकडे पाहत नाहीत. म्हणूनच तर मेसमधून गेल्यानंतरही त्यांचे ऋणानुबंध कायम आहेत. लॉकडाउनच्या काळात लोकांच्या मुखात अन्न गेले पाहिजे. या उद्देशाने ते काम करीत आहेत. दररोज हजाराच्या घरात ते पंगत उठवित आहेत. म्हणजे एका लग्नाचे वऱ्हाड. सकाळी सहा वाजल्यापासून या जेवणाची तयारी सुरू होते. आचारी, चपाती लाटणाऱ्या महिला, अन्न पाकिटे वाटणाऱ्या मुलांचा पगार साईनाथ स्वतः देतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com