पन्हाळा - स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या 'सुपर स्वच्छ लीग' विशेष श्रेणीत पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेने यश मिळविले असून, विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ऐतिहासिक पन्हाळा शहराचा गौरव करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी दिली.