शिरोली : टोप (ता. हातकणंगले) दक्षीणवाडी येथील फेडरल बँकेच्या दारात जुन्या वैमनस्यातून, आणि देवघेवीतून झालेल्या वादावादीचे रूपांतर थेट थरारक घटनेत झाले. शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शिये फाटा परिसरात गणेश शेलार (वय-४६, रा. संभापूर, सध्या रा. नागाव, ता. हातकणंगले) याने विजय पोवार (रा.टोप) व नितीन पाटील रा. संभाजीनगर, कोल्हापूर, सध्या रा. नागाव) यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखून, हवेत तब्बल तीन गोळ्या झाडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेने शिये फाटा व टोप परिसर हादरला. परिसरात भीतीचे सावट पसरले.