सांगलीची परिस्थिती समजून घेते मग दुरुस्त्या करूया; पंकजा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

situation in Sangli

सांगलीची परिस्थिती समजून घेते मग दुरुस्त्या करूया;पंकजा मुंडे

सांगली: जिल्ह्यातील भाजप मला नवीन नाही. मात्र, आताची परिस्थिती थोडी समजून घेते. त्यानंतर आपण त्यात दुरुस्त्या करूया, अशी भूमिका पक्षाच्या प्रभारी, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली.भाजपने जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्या पहिल्यांदाच आल्या होत्या. तुळजापूर येथे दर्शन घेऊन त्यांनी सांगलीचा धावता दौरा केला. येथे त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्या घरी भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना आदरांजली वाहिली.आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रभारीपदी निवडीबद्दल सत्कार केला. भाजप कार्यालयात त्यांनी नेत्यांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ आलय, कारण भाजपच्या कार्यकर्त्यांना नेहमीच लढण्याची सवय आहे. यापूर्वी मी अनेकदा विविध भूमिकेतून जिल्ह्यात येऊन गेले, पण प्रभारी म्हणून मी प्रथमच आले आहे. भाजप नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढत आला आहे. लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरत आला आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी येथे अनेकांना जोडण्याचे काम केलंय, त्यामुळे त्यांच्यासारखे येथे काम करण्याचे मोठे आव्हाण आहे.

आपण सर्व दबंगपणे काम करू, पुन्हा ताकतीने उभा राहू.’ शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, प्रदेश सदस्य नीता केळकर, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, स्वाती शिंदे, विनायक सिंहासने, शिवाजी डोंगरे, सुब्राव मद्रासी, अमर पडळकर, नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अप्सरा वायदंडे, अनिता व्हनखंडे, विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, डॉ. भालचंद्र साठ्ये, श्रीकांत वाघमोडे, दरिबा बंडगर, माधुरी वसगडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Pankaja Munde Understands The Situation In Sangli Then Lets Corrections Interact With Key Leaders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top