पानसरे हत्या प्रकरणी अंदुरे, बद्दीसह मिस्किनला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने आज आणखी तिघा संशयितांना अटक केली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हबीब चाळ, हुबळी, कर्नाटक) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी त्या संशयितांची नावे आहेत. मध्यरात्री तपास पथकाने त्या दोघांचा मुंबई व पुणे येथून ताबा घेतला. पहाटे त्या दोघांना अटक दाखवली. 

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने आज आणखी तिघा संशयितांना अटक केली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हबीब चाळ, हुबळी, कर्नाटक) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी त्या संशयितांची नावे आहेत. मध्यरात्री तपास पथकाने त्या दोघांचा मुंबई व पुणे येथून ताबा घेतला. पहाटे त्या दोघांना अटक दाखवली. 

ज्येष्ठ नेते पानसरे यांची फेब्रुवारी 2015 ला हत्या झाली. या हत्येचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. तो उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. अनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरेला अटक करण्यात आली होती. तसेच ज्यैष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने संशयित बद्दी व मिस्किन या दोघांना अटक केली आहे. त्या तिघांचा पानसरे हत्येशी संबध असल्याच्या संशयावरून कोल्हापूर एसआयटीने त्या तिघांचा ताबा मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार काल रात्री विशेष न्यायालय पुणे येथून अंदुरेचा तर एनआए न्यायालय मुंबई येथून बद्दी व मिस्किन या दोघांचा ताबा घेतला. त्यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री कोल्हापुरात आणण्यात आले. त्या तिघांना कोल्हापूर एसआयटीने मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास अटक केली.

आत्तापर्यंत याप्रकरणी 12 जणांची नावे पुढे आली. त्यातील संशयित सारंग अकोळकर व विनय पवार हे अद्याप तपासयंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत. एसआयटीने केलेल्या या कारवाईमुळे याप्रकरणात महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 

याप्रकरणी तपास यंत्रणेने केलेल्या तपासात यापूर्वी पुढे आलेल्या संशयितांची नांवे - समीर विष्णू गायकवाड (वय 32, सांगली), डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय 48, रा. पनवेल, नवी मुंबई), विनय बाबुराव पवार (रा. उंब्रज, कराड), सारंग दिलीप अकोळकर (रा. शनिवार पेठ, पुणे), अमोल अरविंद काळे (वय 34, पिंपरी चिंचवड, पुणे), वासुदेव भगवान सुर्यवंशी (वय 29, रा. मुक्ताईनगर, जळगाव), भरत जयवंत कुरणे (वय 37, रा. बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (वय 38, रा. कळणे, दोडामार्ग, सिंधूदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (वय 25, केसापुरी, ता. दौलताबाद, औरंगाबाद) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pansare Murder case follow up Andure Miskin arrested