पारनेरकर तहसीलदारबाईंनी फुल्ल धुतले... ऐकत नसल्याने झाल्या सिंघम... बघा कशी केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

तहसीलदार स्वतः ह्या संचारबंदीत उभ्या ठाकल्या असून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे अशी भावना तहसीलदार ज्योती देवरे यांनी माध्यमाशी व्यक्त केली.

टाकळी ढोकेश्वर ः कोरोनो आजाराच्या प्रसारासाठी अटकाव म्हणून राज्य सरकारने संपुर्ण राज्यात (ता.२३) पासून संचारबंदी लागू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर पोलीस प्रशासन आपल्याला दिलेल्या अधिकारा प्रमाणे शहरात व ग्रामीण भागात काम करत आहेत. मात्र, शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकं प्रवास करण्याचे टाळत नसून गाफील पणे दुचाकीवर विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर पोलीस थेट लाठी चार्ज करून लोकांना समज देत आहेत.

पारनेरच्या दमदार तहसीलदार  
पारनेर तालुकयातील दमदार व सिंघम लेडी समजल्या जाणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे ह्या पारनेर शहरात सकाळपासून हातात काठी घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. तालुक्यातील  पारनेर शहर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, लोणीमावळा, निघोज, भाळवणी, कान्हूर पठार आदि महत्वाच्या ठिकाणी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन कार्यरत आहेत.

तहसीलदार स्वतः ह्या संचारबंदीत उभ्या ठाकल्या असून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे अशी भावना तहसीलदार ज्योती देवरे यांनी माध्यमाशी व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाबाबतचा प्रबोधनाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हारयल होत होता. त्यात त्यांनी अगदी मृदू भाषेत लोकांना समजून सांगितले होते. परंतु लोकं विनाकारण रस्त्यावर येत असल्याने त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी हातात काठी घेऊन फटकवायला सुरूवात केली. त्यानंतर मात्र, रस्तयावरची गर्दी ओसरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parnarkar landed on the road without cause and then Tahsildar became Singham ...