पारनेर हा नगरसेवक म्हणाला, तू मला आवडतेस.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

पारनेर : शहरातील दोन गटांत झालेल्या मारामारीत आठ जणांविरोधात गुन्हे दाखल झाला आहे. यात पारनेरचे नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद यांचा समावेश आहे. हा वाद जागेच्या कारणातून झाला आहे. यात एकाने सय्यद यांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची पाच जणांविरोधात तर एका महिलेने नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

परस्परविरोधी फिर्याद

पारनेर : शहरातील दोन गटांत झालेल्या मारामारीत आठ जणांविरोधात गुन्हे दाखल झाला आहे. यात पारनेरचे नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद यांचा समावेश आहे. हा वाद जागेच्या कारणातून झाला आहे. यात एकाने सय्यद यांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची पाच जणांविरोधात तर एका महिलेने नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

परस्परविरोधी फिर्याद

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी ः शुक्रवारी (ता.21) रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पारनेर येथील आनंद हॉस्पिटल समोर नगरसेवक मुदस्सीर रफीक सय्यद (वय 35 ) यांना बबलू दिलावर राजे, दिलावर शेख (रा.शेख वस्ती, ता.पारनेर) व तीन या आनोळखी महिला यांनी काहीएक कारण नसताना कुऱ्हाड मारली. तसेच चाकूचा धाक दाखवून आठ हजार रुपये त्यांच्या खिशातून काढून मुदस्सीर सय्यद व त्याचा भाऊ मुजाहिद यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद नगरसेवक सय्यद यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे.

अन घरात घुसला 

याच घटनेत एका महिलेने नगरसेवक सय्यद यांच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की मी घरामध्ये स्वयंपाक करीत असताना आरोपी सय्यद याने घरात घुसून तू मला आवडते असे म्हणून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तिने नकार दिला असता तिला वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तिच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची पेंडल असलेली चैन गळ्यातून बळजबरीने ओढून धमकी दिली. ती आरडाओरडा करून घराच्या बाहेर पळाली. या गोष्टीचा जाब विचारणाऱ्यांना आरोपी मुजाहिद रफीक सय्यदने मारहाण केली. 

या बाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये मुदस्सीर रफीक सय्यद, मुजाहिद रफीक सय्यद, फर्जाना रफीक सय्यद (रा. पारनेर) त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी. एन. फसले करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parner councilor said you like me