नृसिंहवाडीच्या स्वच्छतेसाठी मुंबई, पुणेसह अनेक भागातील स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

नृसिंहवाडीच्या स्वच्छतेसाठी मुंबई, पुणेसह अनेक भागातील स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक, कोल्हापूरच्या रक्षक ग्रुपचे दोनशेहून अधिक स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा ,हायटेक इंडिया कंपनी जेवी गोकल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, साई संस्था चंद्रपूर व जालना, इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोळ, सांगली यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी नृसिंहवाडीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

नृसिंहवाडी व परिसरातील गावे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रलयंकारी पुराच्या पाण्याखाली होते. त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वीपासून पाणी पातळी उतरण्याची प्रक्रिया जोरदार झाली. तब्बल 12 ते 15 दिवसांनी आपल्या बुडलेल्या घराचं अस्तित्व पाहून व प्रापंचिक साहित्य वरील चिखलगाळ पाहून आश्‍चर्यचकित झाले. अनेक ग्रामस्थाने आपल्या घराची सध्या पै पाहुणे मित्रांसोबत स्वच्छता मोहीम चालू केली आहे.

गावातील प्रमुख मुख्य चौकात गुडघा एवढा चिखल, प्लास्टिक बाटल्या अनेक दरवाजासह वाहून आलेले कापडी वस्तू, फुगलेले व मोडलेले फर्निचर प्लास्टिक, बाटल्या प्रापंचिक चिखलाने माखलेले पहावयास मिळते. प्लास्टिक बाटल्यांचा साचलेला थर चिखलासह अडचणीचा ठरत आहे. सुमारे 15 हून अधिक ट्रॅक्‍टर व पाच जेसीबी यांच्या पुढाकाराने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ग्रामपंचायत व दत्त देवस्थान यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. त्यांच्या अभियानांतर्गत अविरतपणे अनेक संस्थांचे स्वयंसेवक चिखलगाळ काढताहेत.

अनेक पालापाचोळा गोळा करून ट्रॅक्‍टर मध्ये भरताहेत, पाणी घेऊन तो परिसर स्वच्छ करीत आहेत. अस्मानी संकटांमध्ये अनेक दानशूर संस्था आजी माजी आमदार, खासदार यांनी देखील यासाठी इतर गावाप्रमाणे नृसिंहवाडीत सक्रिय झाले आहेत. उपसरपंच अभिजात जगदाळे यांच्या पुढाकाराने राज्याचे वीज वितरण आयुक्त संजीवकुमार यांनी दोनच दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात येईल असे सांगितले.

ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री खिरुगडे, उपसरपंच गुरुदास खोचरे, कृष्णा गवंडी, कमिटीचे रमेश मोरे, संजय शिरटीकर, देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी व सचिव अमोल विभूते यांच्या व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने चिखलगाळ काढण्याची व परिसर स्वच्छ करण्याचे स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्या चिखल गाळ काढण्याच्या प्रक्रियेला अनेक स्वयंसेवी संस्थांचे निरपेक्षपणे मदत लावल्यामुळे गावातील चिखल बाजूला होऊन अनेक रस्ते, चौकातील मार्ग मोकळे होऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत चालले आहे. 

उत्सवमूर्ती दत्त मंदिरात

तब्बल तेरा दिवसांपूर्वी दत्त मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरात, त्यानंतर टेंबेस्वामी मंदिरात, त्यानंतर महेश हावळे व कडू पुजारी यांच्या माडीवर असा प्रवास उत्सवमूर्तीने केला. त्यानंतर आज परत वाजत-गाजत ब्रह्मवृंद यांच्या सहकार्याने उत्सवमूर्ती दत्त मंदिरात परत नेण्यात आली. 

नृसिंहवाडीमध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे तेरा दिवस हून अधिक काळ श्री क्षेत्र पाण्याखाली राहिले. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून परिसरातील चिखलगाळ, केर कचरा काढण्याचे काम जेसीबी व ट्रॅक्‍टरने युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे निदान भाविकांनी अजून पंधरा दिवस तरी श्रींचे दर्शन घेण्यास येऊ नये. जेणेकरून कोणीही भाविक साथीच्या आजाराला बळी पडू नये ही आम्ही खबरदारी घेत आहोत

- जयश्री खिरुगडे, सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com