Satara : पश्चिम महाराष्ट्रात संचारणाऱ्या आठ वाघांवर वनविभागाचं शिक्कामोर्तब!

कोकण आणि कोकणमार्गे कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रात संचार करणा-या वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहोर उमटवली
satara
satarasakal

कऱ्हाड : कोकण आणि कोकणमार्गे कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रात संचार करणा-या वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहोर उमटवली. दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचा वनविभाग आणि शास्त्रज्ञांना आठ वाघांचे दर्शन झाले आहे. पैकी वाघाची जोडी जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे, अशीही माहिती वन्यजीव विभागाने दिली.

कर्नाटक आणि गोवा राज्यांतून काही काळासाठी कोकण आणि कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्राच्या पट्ट्यात वाघ येतात. गुरांची शिकार होत असल्याने भागांत वाघ दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. दोनवर्षांपूर्वी कोकण आणि कोल्हापूरात जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात आठ वाघ वावरताना शास्त्रज्ञांना दिसले. २०१४ सालापासून वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट संस्था कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकणातून वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. आठवर्षांपासून वाघाची जोडी कोकणात कायमस्वरुपी राहत असल्याची वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी दिली.

ते म्हणाले, अन्य सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत असले तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणणे घाईचे ठरेल. दरवर्षाला कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यांत किती वाघ स्थायिक झालेत याबाबतची खात्रीलायक माहिती मिळेल. वनविभाग वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांना तातडीने नुकसानभरपाई देत आहे. ही बाब वाघांच्या संवर्धनाला हातभार लावण्यास मदत करत असल्याचे समाधानही पंजाबी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघ काही काळासाठी कोकण पट्ट्यांत येत आहेत. वाघीणींची संख्या कमी असल्याने वाघ या भागांत फार काळ थांबत नाहीत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपमध्ये, वाघ आणि इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या वसाहतीसाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा आहे. काली व्याघ्र प्रकल्प आणि लगतच्या भागात प्रजननक्षम वाघांची संख्या असल्याने, या कॉरिडॉरमध्ये उत्तरेकडे वाघांची हालचाल दिसून येते. या अरुंद कॉरिडॉरचे तुकडे करा आणि जंगलाच्या जमिनीवर कोणत्याही किंमतीला परवानगी दिली जाऊ नये. बॉक्साईट खाण ही पश्चिम घाटातील सर्वात विनाशकारी क्रिया आहे. मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॉरिडॉरचे क्षेत्र गंभीरपणे घेण्याचे गरज आहे. शेवटचे उरलेले अधिवास अबाधित आहे. काही क्षेत्रे संवर्धन राखीव म्हणूनसंरक्षित आहेत. संवर्धन राखीवच्या बाहेरील क्षेत्रांना खाणकामांमुळे धोका आहे.

असे आहे, कॅमेरा ट्रॅपचे सर्वेक्षण

नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरातील तब्बल २२ ठिकाणी प्रत्येकी कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले गेले. त्यानंतर वाघांच्या छबी टिपल्या आहेत.

मार्च महिन्यात कोल्हापूरातील राधानगरीत आढळून आलेला वाघ आता अभयारण्याबाहेर ये-जा करु लागला आहे. या वाघाला स्थानिक म्हणता येणार नाही, अभयारण्यात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. कोकण आणि कोल्हापूरात वाघांचा वावर असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे.

विशाल माळी विभागीय वनाधिकारी, कोल्हापूर वनविभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com