

Cloudy weather and unseasonal rain affect grape orchards in Sangli district.
sakal
सांगली : गेल्या आठवड्यापासून सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामान राहिले होते. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र उद्यापासून (ता. १६) जिल्ह्यात पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येणार असून थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला.