राणी चन्नम्मा एक्स्प्रेस 7 पासून रुळावर ; मिरज ते बंगळूर दरम्यान धावणार

passenger demand 28 special trains run from 7 to 19 december in belgaum
passenger demand 28 special trains run from 7 to 19 december in belgaum

बेळगाव : प्रवाशांच्या मागणीनुसार नैर्ऋत्य रेल्वेने 28 अतिरिक्त स्पेशल रेल्वे सुरु केल्या आहेत. यामध्ये बंगळूर, मिरज, हुबळी, धारवाड, म्हैसूर, चामराजनगर, होसपेट आदी ठिकाणी 7 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत या रेल्वे धावणार आहेत. बंगळूर-धारवाड-बंगळूर डेली सुपरफास्ट इंटरसिटी एक्‍सप्रेस स्पेशल बंगळूर येथून 7 ते 16 डिसेंबर तर धारवाड येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. हुबळी-बळ्ळारी-हुबळी डेली एक्‍सप्रेस स्पेशल हुबळी येथून 7 ते 16 डिसेंबर व बळ्ळारी येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. 

धारवाड-सोलापूर-धारवाड डेली एक्‍सप्रेस स्पेशल धारवाड येथून 7 ते 16 डिसेंबर व सोलापूर येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावेल. हुबळी-सोलापूर-हुबळी डेली एक्‍सप्रेस स्पेशल हुबळी येथून 7 ते 16 डिसेंबरपर्यंत ते सोलापूर येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत तर वास्को-द-गामा-कुलेम-वास्को-द-गामा डेली एक्‍सप्रेस स्पेशल दोन्ही बाजूंनी 7 ते 16 डिसेंबरपर्यंत धावेल. 

म्हैसूर-चामराजनगर-म्हैसूर डेली एक्‍सप्रेस स्पेशल दोन्ही बाजूंनी 7 डिसेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. यशवंतपूर-होस्पेट-यशवंतपूर डेली एक्‍सप्रेस स्पेशल यशवंतपूर येथून 7 ते 16 डिसेंबर तसेच होसपेट येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावेल. यशवंतपूर-हसन-यशवंतपूर डेली सुपरफास्ट इंटरसिटी रेल्वे यशवंतपूर येथून 7 ते 16 डिसेंबर आणि हसन येथून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. 

म्हैसूर-केएसआर बंगळूर-म्हैसूर डेली सुपरफास्ट एक्‍स्प्रेस म्हैसूर येथून 7 ते 16 डिसेंबर व बंगळूर येथून 8 ते 17 डिसेंबर, म्हैसूर-तलगुप्पा-म्हैसूर डेली एक्‍सप्रेस स्पेशल म्हैसूरहून 9 ते 18 डिसेंबरपर्यंत, तलगुप्पा येथून 10 ते 19 डिसेंबरपर्यंत, म्हैसूर-बागलकोट-म्हैसूर डेली एक्‍सप्रेस स्पेशल म्हैसूरहून 7 ते 16 डिसेंबरपर्यंत तसेच बागलकोटमधून 8 ते 17 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. 


राणी चन्नम्मा एक्‍सप्रेस अशी धावणार 

राणी चन्नम्मा एक्‍सप्रेस बंगळूर-मिरज-बंगळूर डेली एक्‍सप्रेस स्पेशल बंगळूरहून 7 ते 16 डिसेंबर व मिरजहून 8 ते 17 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. मिरजहून दुपारी 3.45 वाजता निघेल. ती उगार खुर्द, कुडची, चिंचली, रायबाग, चिक्‍कोडी, घटप्रभा, गोकाक, पाच्छापूरमार्गे बेळगावला सायंकाळी 6.40 वाजता पोचेल. लोंढा, अळणावर, दावणगेरी, तुमकुर, यशवंतपूरमार्गे बंगळूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोचेल. बंगळूरहून रात्री 9.15 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 वाजता बेळगावला पोचते. तसेच दुपारी 12 वाजता मिरज येथील स्थानकावर पोचेल. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com