सांगली जिल्ह्यातून दिले 3 हजारावर कामगारांना दिले पास 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली, ः सांगली जिल्ह्यातून शेजारील कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यात कामासाठी दररोज येजा करण्यासाठी पासेस देण्याची सुविधी 31 जुलै अखेर सुरुच राहणार आहे.

सांगली, ः सांगली जिल्ह्यातून शेजारील कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यात कामासाठी दररोज येजा करण्यासाठी पासेस देण्याची सुविधी 31 जुलै अखेर सुरुच राहणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कामगारांना जिल्हा उद्योग केंद्रातून पासेस देण्यात येत आहेत. जिल्हा उद्योग केंद्राकडून 3 हजार 157 लोकांना पासेस देण्यात आले आहेत. 
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास दिले जात आहेत. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर पासेस देण्याचे काम सुरु आहे. 
.................. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passes issued to over 3 thousand workers from Sangli district