"पतंजली'ची स्वदेशी समृद्धी कार्ड योजना जाहीर

अलताफ कडकाले
सोमवार, 19 मार्च 2018

सोलापूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनाने अक्षरशः संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. पतंजलीची उत्पादने ग्राहकांना भुरळ घालत असून विश्‍वासास पात्र ठरल्याने पतंजलीची ही उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे.

भविष्यकाळात ही उलाढाल तब्बल 50 हजार कोटींचा टप्पा पार करून पतंजलीला देशातील सर्वश्रेष्ठ कंपनी सिद्ध करण्यासाठी रामदेव बाबा यांनी नुकतीच "पतंजली स्वदेशी समृद्धी कार्ड योजना' जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कॅशलेस योजनेला साद घालणारी आहे. 

स्वदेशीचा नारा देत खुल्या बाजारात उतरलेल्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना शीर्षासन करायला लावून त्यांच्याशी कडवी झुंज देत देश-विदेशातील लाखो कुटुंबांच्या घरात व मनामनांत पोचलेल्या पतंजलीने गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ व आयुर्वेदिक औषधे आदी सुमारे एक हजार उत्पादने निर्माण करून जगभरातील मोठी बाजारपेठ काबीज केली आहे.

पतंजली नुसता देशापुरता मर्यादित न राहता जागतिक ब्रॅंड बनला असून दिवसेंदिवस पतंजलीची लोकप्रियता वाढत आहे. बाजारात सर्व ठिकाणी पतंजलीची सर्वच उत्पादने ग्राहकांना आकृष्ट करीत आहेत. त्यामुळे कंपनीचा विश्‍वास दुणावला आहे. जगाच्या बाजारपेठेत टिकायचे असेल तर ग्राहकांना व विक्रेत्यांना खुश करणाऱ्या नवनवीन योजना द्याव्या लागतात. याचा अचूक अभ्यास असणाऱ्या रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या उत्पादनावर भरभरून सूट देणारी "स्वदेशी समृद्धी कार्ड योजना' नुकतीच जाहीर केली आहे. ही योजना देशभरातील पतंजली आरोग्य केंद्र, चिकित्सालय, मेगा स्टोरवर उपलब्ध असणार आहे. 

काय आहे स्वदेशी समृद्धी कार्ड योजना?
इतर कंपन्यांच्या मॉलमध्ये ग्राहकांना खरेदीवर सूट देण्यासाठी ज्याप्रमाणे स्मार्ट कार्ड दिले जाते त्याप्रमाणे पतंजलीनेही आता असे स्मार्ट (क्रेडिट) कार्ड लॉंन्च केले आहे. त्याचे नाव आहे समृद्धी कार्ड योजना. 

स्वदेशी कार्डचा फायदा काय? 
- या कार्डमार्फत देशभरातील कोणत्याही आरोग्य केंद्र, चिकित्सालय, मेगा स्टोरवर खरेदी करता येईल. 
- कॅशलेस योजनेतील महत्त्वाकांक्षी पाऊल. 
- ग्राहक खरेदीवर 5 ते 10 टक्के सवलत मिळवू शकते. 
- समृद्धी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंत विमाही असेल. 

समृद्धी कार्ड योजनेचे नियम 
- हे कार्ड फक्त आरोग्य केंद्र, चिकित्सालय, मेगा स्टोरवर उपलब्ध असून याचे सदस्यता मूल्य 150 रुपये आहे. 
- टॉप अप प्रमाणे रिचार्ज करावे लागणार. 
- कमीत कमी एक हजार रुपये रिचार्ज करावा लागेल. जास्तीत जास्त मर्यादा 50 हजार रुपये. कमिशनसह यामध्ये पैसे जमा होतील. 
- दिवसातून 10 हजारांपर्यंत कोणत्याही वस्तू पाच ते 10 टक्के कमिशनवर खरेदी करता येतील. 
- प्रतिमाह एक हजाराची खरेदी केल्यास त्यावर पाच लाखांचा विमा भेटू शकतो. 
- सैनिकांना कोणत्याही अपघातावर पाच लाखांचा विमा मिळणार. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही संकल्पना आहे. भविष्यकाळात पतंजली समृद्धी कार्ड योजनेद्वारे डिजिटल पेमेंट करणारी भारतातील सर्वांत मोठी संस्था असेल जी कॅशलेस व्यवस्थेला समृद्ध करील, असे पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले.  
 
Web Title: Patanjali declared swadeshi samruddhi card scheme