

Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Sakal
पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा
धारदार शस्त्राने खून, सांगली जिल्ह्यात घबराट
मिरज, ता. ८ : मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे आज रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील (वय ३२) याचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या घटनेमुळे संपूर्ण मिरज पूर्व तालुका हादरला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटनास्थळ व पोलिस यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, मृत ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. आज रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने गंभीर वार केल्यामुळे ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या काही दिवसांपासून सांगली शहर आणि जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मिरज तालुक्यातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, यामागे जुने भांडण किंवा टोळीयुद्ध असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोनी-पाटगाव परिसरात सध्या चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.