जनतेची सहनशीलता संपली आहे; रस्त्याचे काम सुरू करा

The patience of the masses is exhausted; Start the road work
The patience of the masses is exhausted; Start the road work

पलूस : विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्‍यातील काम चार वर्षांपासून रखडले आहे. खराब रस्त्यांमुळे लोक वैतागलेत. अपघात वाढलेत. जनतेची सहनशीलता संपली आहे. रस्त्याचे काम त्वरीत सुरू करा. अन्यथा जनता रस्त्यावर येईल. त्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी महामार्ग समितीच्या अधिकाऱ्यांना दिला. डॉ. कदम यांनी त्यांची खरडपट्टी काढली. अधिकाऱ्यांनाही बोलताही आले नाही. 

येथे विजापूर-गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्‍यातील रखडलेल्या कामाबाबत मंत्री डॉ. कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश सागांवकर व इतर अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन स्थितीची माहिती घेतली. डॉ. कदम व जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड आक्रमक झाले होते. 
तुपारी फाटा ते येळावी फाटा येथील काम रखडले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चार-पाच वर्षापासून काम सुरू आहे. वाहन चालवणे अवघड झाले आहे. अनेक अपघात होत आहेत. काहींना जीव गमवावा लागला. त्याचे अधिकाऱ्यांला देणे-घेणे नाही. काम त्वरीत पूर्ण करा अन्यथा तालुक्‍यातील जनता रस्त्यावर येईल. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक घेणार आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. 

श्री. सागांवकर यांनी पहिली निविदा रद्द करून नविन डांबरीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे. खड्डे बुजवून कारपेट करण्यात येईल. काम पंधरा दिवसांत होईल, असे सांगितले. लाडही आक्रमक होते. त्यांच्या प्रश्नांची अधिकारी योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. काम अडवलं म्हणून कारवाई करताता. तीच तत्परता काम पूर्ण करण्यासाठी का दाखवत नाही? असा सवाल त्यांनी केला. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com