esakal | रुग्णाला ऍम्ब्युलन्समध्येच राहावे लागले पाच तास तिष्ठत 
sakal

बोलून बातमी शोधा

The patient had to stay in the ambulance for five hours

कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. 

रुग्णाला ऍम्ब्युलन्समध्येच राहावे लागले पाच तास तिष्ठत 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. खणभागातील एक कोरोना संशयित रुग्णाला उपचारासाठी मिरज मिशनला ऍम्बुलन्समधून हलविण्यात आले होते. पण तेथे कोणी दखल न घेतल्यामुळे या रुग्णास ऍम्ब्युलन्समध्येच उपचाराअभावी दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत तिष्ठत बसावे लागले. याबरोबरच आणखी चार-पाच ऍम्ब्युलन्समध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण तेथे उपचाराच्या प्रतिक्षेत होते. हे समजताच नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. 

नगरसेवक चव्हाण यांनी याप्रकरणी तातडीनेआयुक्त नितीन कापडनीस यांच्याशी संपर्क साधून उपचारास सूचना करण्याचे विनंती केली त्यानंतर उपचाराचा मार्ग मोकळा झाला. चव्हाण म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे उपचारासाठी यंत्रणा कमी पडू लागली आहे. पण यंत्रणेचे नियोजन नाही. खणभागात एका 35 वर्षीय रुग्णाला त्रास होत होता. त्यामुळे त्याला ऍम्ब्युलन्समधून मिरज मिशन हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. पण तेथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला. 

आणखी चार ऍम्ब्युलन्समध्ये तेथे रुग्ण उपचाराअभावी दरवाजातच इव्हळत होते. हा संतापजनक प्रकार समजताच मी, माजी नगरसेवक किशोर लाटणे यांच्यामवेत तेथे गेलो. हॉस्पिटलमधील यंत्रणेला जाब विचारल्यानंतरही कोणी दखल घेईना. अखेर आयुक्त कापडनीस यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तेथे अधिकाऱ्यांना पाठविले. त्यानंतर रुग्णांना दाखल केले. 

शहरात झपाट्याने अँटिजन तपासण्या सुरू आहेत. त्यासाठी सक्ती सुरू आहे. पण त्यातून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. जर हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्याला जबाबदार कोण? यंत्रणेने याबाबत समन्वय ठेवून हॉस्पिटल्स, बेड वाढवावेत. 
- मंगेश चव्हाण, नगरसेवक  

संपादन : प्रफुल्ल सुतार