esakal | ..अखेर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा मुहूर्त लागला ; 2062 जागांची यादी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

..अखेर शिक्षक भरतीचा मुहूर्त लागला ; 2062 जागांची यादी जाहीर

sakal_logo
By
दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली) : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित ,प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला अखेर गुरुवारी दि.२ सप्टेंबर रोजी मुहूर्त सापडला असून, खासगी व्यवस्थापनाच्या ५६१ शैक्षणिक संस्थांच्या २०६२ जागाची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवारात आनंदी वातावरण आहे.

राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक उच्च इ. ६ वी ते १२ चे वर्ग असणाऱ्या शाळेतील शिक्षकांच्या पवित्र पोर्टलच्या भरतीला मुहूर्त सापडत नव्हता. अनेक वेळा ही भरती होणार असा गाजावाजा झाला. मध्यंतरीच्या काळात बिगर मुलाखतीच्या सहा हजार भरण्यात आल्या होत्या. उर्वरित सहा हजार जागांसाठी मुलाखतींची भरती होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरती रखडली होती.

खासगी व्यवस्थापनाच्या ५६१ शैक्षणिक संस्थेतील २०६१ जागाची यादी आज जाहीर झालेले आहे. या भरती प्रक्रियेसाठी दिनांक १३/९/२१ ते दिनांक ते १४/१०/२१ या काळात एका जागेसाठी दहा उमेदवारांची मुलाखत संस्था स्तरावर होणार आहे. अनेक दिवस रखडलेली भरती आता शासनाने सुरू केल्याने उमेदवार व शैक्षणिक संस्थाचालक यांच्यात आता आनंदी वातावरण आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी यासाठी गेले अनेक दिवस आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो. शासनाने आज खाजगी व्यवस्थापनातील शाळेच्या मुलाखती याद्या जाहीर करून भरती प्रक्रिया मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हाला यश प्राप्त झाले आहे .

-संतोष मगर,संस्थापक अध्यक्ष, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन

loading image
go to top