
सांगली : विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश पवार टोळीला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. टोळीप्रमुख आकाश यल्लाप्पा पवार (वय ३२, उत्तर शिवाजीनगर, माकडवाले कमानीजवळ) व आकाश प्रकाश देवर्षी (२४, न्यू रेल्वे स्टेशन, वांगीकर प्लॉट, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांवर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.