video एका क्लिकवर भरा मालमत्ता कर

nagar muncipal
nagar muncipal

नगर : लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून त्यावर सूट मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवे ऍप बनविले आहे. "अहमदनगर पे टॅक्‍स' असे त्याचे नाव आहे. नागरिकांनी या ऍपद्वारे मालमत्ता कर भरल्यास त्यावर 10 टक्‍के सूटही मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक कर निर्धारक गबाजी झिने यांनी दिली.

दरवर्षी 1 ते 30 एप्रिलदरम्यान मालमत्ताकर भरल्यास नागरिकांना 10 टक्‍के सूट मिळते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांना कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरता येणे शक्‍य नाही. शिवाय महापालिका कर्मचाऱ्यांनाही घरोघर जाऊन करवसुली करणे अवघड आहे. नागरिकांना 10 टक्‍के सूटीचा फायदा घेता यावा, यासाठी महापालिकेने नवे ऍप तयार केले आहे. महापालिका प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांना 10 टक्‍के सूट मिळणार आहे. 


ऍपमुळे कर भरण्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहे. शिवाय 10 टक्‍के सूट मिळणार आहे. शिवाय महापालिकेचे करसंकलनही ऑनलाईन होणार आहे. या सुविधेमुळे महापालिकेचा कर विभाग कॅशलेसच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 
 
असा करा ऍपचा वापर 
महापालिकेचे हे ऍप "प्ले-स्टोअर'वर उपलब्ध आहे. त्यात सुरवातीला नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक रक्‍तगट आदी माहिती भरल्यावर मोबाईलवर "ओटीपी' येईल. तो क्रमांक भरल्यावर नोंदणी केली जाईल. त्यानंतर हे ऍप वापरता येणार आहे. त्यावर महापौर व महापालिका आयुक्‍तांनी नागरिकांना काही संदेशही दिले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांचे नाव, पद व दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध आहे. शिवाय माहिती अधिकार, महापालिका क्षेत्राचा नकाशा, ई-टेंडर, नवीन योजनांची माहिती मिळणार आहेत. मालमत्ता क्रमांक टाकून बील मिळविता येईल. ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यावर तेथेच त्याची पावतीही मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com