बेशिस्त नगरकरांच्या खिशाला कात्री

Penalty action against the driver for breaking the rules marathi news
Penalty action against the driver for breaking the rules marathi news
Updated on

नगर : शहर वाहतूक शाखेतर्फे जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांत विनाहेल्मेट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, अवैध प्रवासी वाहतूक, ड्रंक अँड ड्राइव्ह आदींविरोधात कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेमुळे वाहतूक शाखेच्या तिजोरीत सुमारे पावणेदोन कोटींचा महसूल जमा झाला आहे. एकंदरीत, 66 हजार 983 नगरकरांना बेशिस्तीमुळे वर्षभरात एवढा मोठा दंड भरावा लागला. 

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेकडून सुरू आहे. शिस्तीच्या धड्यांमध्ये वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम नेहमीच राबविली जाते. या मोहिमेत विनाहेल्मेट, कागदपत्रे नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, विना नंबर प्लेट आदी कारणांवरून 65 हजार 65 जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून एक कोटी 52 लाख 75 हजारांचा महसूल जमा झाला. अवैध प्रवासी वाहनांवर वाहतूक शाखेकडून नेहमीच कारवाईची मोहीम राबविली जाते. वर्षभरात एकूण 500 वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करून 10 लाख 61 हजार 300 रुपये दंड वसूल केला. ड्रंक अँड ड्राइव्हवर वाहतूक शाखेकडून विशेष लक्ष दिले जाते. 

नगरमध्ये 295 जणांवर कारवाई

मागील वर्षात शहरात 295 जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख 43 हजार 500 रुपयांचा महसूल जमा केला. जानेवारी ते डिसेंबर 2019दरम्यान वाहतूक शाखेने एक कोटी 69 लाख 10 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. सुमारे 500 वाहनांवर कारवाई करून 10 लाख 61 हजार 300 रुपयांचा दंड केला. या कारवाईमध्ये वाहतूक शाखेने 222 वाहनचालकांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले. 92 जणांचे निलंबनाचे प्रस्ताव वाहतूक परिवहन विभागाकडे कारवाईसाठी पाठविले आहेत. 

"ड्रंक अँड ड्राइव्ह'च्या 1097 कारवाया

जानेवारी ते डिसेंबर 2019दरम्यान एकूण 1097 "ड्रंक अँड ड्राइव्ह'च्या केस वाहतूक शाखेने केल्या. संबंधितांकडून तीन लाख 93 हजार 400 रुपये दंड वसूल केला. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 292 कारवाई झाल्या. 

नियमांचे पालन करणे गरजेचे 
प्रत्येकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच, दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी चालविताना सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. 
- अविनाश मोरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com