लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तोच मी घेतला : उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पाटण (ता. कऱ्हाड) येथे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली. 

उदयनराजे यांनी पाटण (ता. कऱ्हाड) येथे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले आज थोरले साहेब अर्थात शरद पवार हे साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे लागेल आता नरेंद्र पाटील , शंभूराज आणि मी असे एकत्र झालो आहोत त्यामुळे मी पाटणची चिंता सोडलेली आहे. 

कऱ्हाड - चिपळून हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोकणशी जोडला जाणार असल्याने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात व्यापाराची जाळे निर्माण होईल. गेल्या पंधरा वर्षात कृष्णा खोरे प्रकल्पाची कामे कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने पूर्ण करायला पाहिजे होती. ती आता भाजप - सेना युती सरकारने हाती घेत मार्गी लावलेली आहेत. 

पाटण तालुक्‍यातील वांग - मराठवाडी आणि तारळी प्रकल्पाचे पाणी धरणाच्या वरील क्षेत्राला देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. माझी राजकारणातील भूमिका स्पष्ट असते मी लपून काही करत नाही. इशू बेस पॉलिटिक्‍सवर मी भर देतो. जिंदाल स्टील वर्क्‍स यांचा शासनाशी करार झालेला असून कराड- चिपळूण परिसरातील लोकांना व युवकांना रोजगार मिळेल असे नमदू केले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्यात राजीनामा दिला जे लोकांना अपेक्षित होते तेच मी केले असे मला वाटते.

पूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात सरसकट राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे खासदार आणि आमदार होते मग हा परिसर अध्याप मागास राहिला अशी खंत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People was expecting same decision which i took says Udayanraje Bhonsle