विटा शहरात स्वच्छतेची लोकचळवळ जोमाने सुरु 

The people's movement for cleanliness started in the city of Vita
The people's movement for cleanliness started in the city of Vita

विटा : विटा नगरपरिषदेने "स्वच्छ सर्वेक्षण 21' अंतर्गत तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेचा उपक्रम राबविला. यामध्ये तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सहभाग घेत स्वच्छता श्रमदान मोहीम गतीमान करण्यासाठी मदत केली. 

विटेकर नागरिक व पालिकेच्या समन्वयातून विटा शहरात स्वच्छतेची लोकचळवळ मोठ्या जोमाने सुरु आहे. विटा नगरपरिषदेने स्वच्छता श्रमदान मोहीमेत आपली प्रशासकीय इमारत स्वच्छता करत परिसर स्वच्छ व सुंदर केला. विटा नगरपरिषदेने स्वच्छता जनजागृतीसाठी व स्वच्छ सर्वेक्षणची जय्यत तयारी केली असून या अंतर्गत स्वच्छ श्रमदान मोहीम विटा शहरातील विविध भागात राबवण्यात येत आहेत. 

शहरातील संस्था, मंडळे, महिला व नागरिक यांच्या सहभागातून या स्वच्छता श्रमदान अभियानात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत तसेच रस्ते, गटारी सफाई करुन श्रमदान मोहीम यशस्वीपणे पार पाडली जात आहे. यामध्ये यापुढे ही असेच सक्रिय योगदान नागरिकांनी यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे. 

शहरात स्वच्छता श्रमदान अभियान नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील,×ऍड. वैभव पाटील, उपनगराध्यक्ष ऍड. अजित गायकवाड, फिरोज तांबोळी यांच्या मार्गदर्शनखाली हे स्वच्छता श्रमदान अभियान यशस्वी करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॅंड ग्लोज, मास्क व सोशल डिस्टन्सिंग आदी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घेतलेल्या स्वच्छता श्रमदानात तहसिलदार ऋषिकेत शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, फिरोज तांबोळी, अविनाश चोथे, शिक्षण सभापती ऍड. विजय जाधव, कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, असलम शेख, रोहीत पवार आदी सहभागी झाले होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com