ग्रामसभेने नाकारली बिअर बारला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

पेड ( ता. तासगाव ) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेली ग्रामसभा उत्साहात पार पडली. यावेळी पेड पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भालेखडा ( पेड ) येथे पेड हद्दीमध्ये परमिट रूम बियर बार चालू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केला होता याला ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत बियर बारला परवानगी न देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली 

पेड : पेड ( ता. तासगाव ) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेली ग्रामसभा उत्साहात पार पडली. यावेळी पेड पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भालेखडा ( पेड ) येथे पेड हद्दीमध्ये परमिट रूम बियर बार चालू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केला होता याला ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत बियर बारला परवानगी न देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली 

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब पाटील होते. तर ग्राम विकास अधिकारी ए. एम. खरमाटे यांनी मागील इतिवृत्त वाचून कायम केले.

यावेळी पेड गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भालेखडा येथे परमिट रूम बियर बार चालू करण्यासाठी परवानगी मागितली होती याला गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.

यावेळी गावातील लोकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत असून लवकरात लवकर ती भरावी अन्यथा पाणीपट्टी थकीत असणाऱ्यांचे नळ कनेक्‍शन येत्या चार दिवसात तोडण्यात येईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर गावामध्ये कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक करण्यात यावी. पाझर तलावातील गाळ काढणे तसेच तलावांची दुरुस्ती करणे, यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी गावातील विविध विकास कामांची माहिती लोकांना दिली.

यावेळी कृषी अधिकारी सचिन कोरटे, भाऊसाहेब पाटील, जालिंदर शेंडगे, दत्तात्रय शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: permission to Beer bar denied by Gram Sabha