सांगली जिल्हा हद्दीत पेट्रोल व डिझेल विक्री बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 25 मार्चपासून सांगली जिल्ह्यातील हद्दीत सर्व पेट्रोल पंपधारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 25 मार्चपासून सांगली जिल्ह्यातील हद्दीत सर्व पेट्रोल पंपधारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol and diesel sales close in Sangli district