Video : पट्टणकोडोलीत ढोल-कैताळांच्या गजरात गोंधळ नृत्य

पट्टणकोडोली - विठ्ठल बिरदेव मंदिरात फरांडेबाबांचा गोंधळ नृत्याचा भक्तिमय सोहळा.
पट्टणकोडोली - विठ्ठल बिरदेव मंदिरात फरांडेबाबांचा गोंधळ नृत्याचा भक्तिमय सोहळा.
Updated on

पट्टणकोडोली - पाच राज्यात प्रसिद्ध असणार्‍या येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील गोंधळ नृत्याचा सोहळा भक्तिमय वातावरणात आज सायंकाळी पार पडला. हा सोहळा पाहण्याासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

शनिवारपासून (ता. १९) सुरु झालेल्या येथील विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रा काळातील श्रींचे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले आहेत.

श्रींच्या मुख्य मंदिर‍ात सायंकाळी फरांडेबाबांचा ( खेलोबा वाघमोडे) गोंधळ नृत्य सोहळा पार पडला. फरांडेबाबांसोबत हजारो भक्तगण आले आहेत. यातील सुमारे ५० हुन अधिक भक्तांसह फरांडेबाबांनी मुख्य मंदिरात गोलकडे करुन ढोल-कैताळांच्या गजरात हे नृत्य केले. हा सोहळा पाहण्यासाठी मंदिर‍ात हजारो भक्तांनी हजेरी लावली होती. महिलाही मोठ्या प्रमाणात या सोहळ्यास उपस्थित होत्या. 

यात्रेतील हेडाम नृत्य व भाकणुकीनंतर फरांडेबाबां मंदिराच्या मागील बाजुस दगडी गादीवर विराजमान झाले होते. तिथेही त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाकणुकीच्या दुसर्‍यादिवशी मुख्य मानकरी प्रकाश पाटील यांच्या घरी उपवास सोडण्यासाठी फरांडेबाबा जातात. भक्तांच्या आग्रहाखातर पाटील यांच्या घरी सकाळी ते गेले. तेथे त्यांनी उपवास सोडला व त्यानंतर त्यांनी गादीवर बसुन भक्तांना दर्शन दिले. 

उद्या दुपारी फरांडेबाबांच्यावतीने भागिरथी देवीची ओटी भरणी सोहळा होणार आहे. त्यानंतर निरोप घेवून फरांडेबाबा परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. याबरोबरच यात्रा काळातील सर्व धार्मिक सोहळे ही थांबणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com