औषध दुकानदाराची साडेसात लाखांची फसवणूक ; वाचा कुठे घडली घटना

पोपट पाटील
Sunday, 12 July 2020

येथील यल्लमा चौकातील औषध दुकानदारास मुंबईच्या व्यापाऱ्याने औषधाचे साहित्य देतो म्हणून 7 लाख 31 हजार 369 रुपयांची फसवणूक केली.

इस्लामपूर (जि. सांगली ) : येथील यल्लमा चौकातील औषध दुकानदारास मुंबईच्या व्यापाऱ्याने कोव्हीड 19 वातावरणाचा फायदा घेऊन औषधाचे साहित्य देतो म्हणून 7 लाख 31 हजार 369 रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी व्यापारी दर्शन बी व्होरा (रा.वसई,मुंबई ) याच्या विरोधात दुकानदार विनोद दीपक सोनवणे (रा.इस्लामपूर)यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती , "3 जुलै सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दर्शन व्होरा याने त्याच्या फोन वरून विनोद सोनवणे याला मी मेडिकल उत्पादनाची होलशेल विक्री करत आहे असे सांगितले.त्यावर विनोद याने व्होरा याला त्याच्याकडील उत्पादनाचे फोटो व्हाट्‌सअप वरती पाठविण्यास सांगितले.

ते फोटो तपासून विनोद यांनी व्होरा याला मेडिकल उत्पादनाची ऑर्डर दिली. त्याचे बिल 13 लाख 30 हजार इतके झाले.सदर बिलाचा ऍडव्हान्स म्हणून दर्शन व्होरा याच्या बोरीवली येथील आय डी एफ सी बॅंक खात्यात विनोद यांनी 3 जुलैला 2 लाख 31 हजार 369 व 4 जुलैला 5 लाख रुपये युनियन बॅंक शाखा इस्लामपूर येथुन आर टी जी एस केले. त्यावर दर्शन याने उद्या तुमचा माल पाठवतो असे फोनवर सांगितले. 

दोन दिवस झाले तरी अजून माल आला नाही म्हणून विनोद यांनी गाडी चालकाला फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार दर्शन व्होरा याला विनोद फोन करीत होते परंतु तो फोन उचलत नव्हता.एकदिवस त्याच्या पत्नीने फोन उचलला व तुमचे पैशे तुम्हाला परत मिळतील असे सांगितले.परंतु अद्याप ती रक्कम मिळाली नाही. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pharmasist looted for 7.5 lakh in Inlampur