एरंडोलीत पाईपलाईन दुरूस्ती अडकली; कागदी घोड्यात, 20 ठिकाणी गळती काढूनही पाणी पुरवठा बंद

भाऊसाहेब मोहिते
Friday, 23 October 2020

राज्य मार्गाचे काम करताना पाईपलाईन फुटल्याने एरंडोलीत गेल्या सहा महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या कागदी घोड्यात अडकला आहे. 

एरंडोली (जि. सांगली) ः राज्य मार्गाचे काम करताना पाईपलाईन फुटल्याने एरंडोलीत गेल्या सहा महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या कागदी घोड्यात अडकला आहे. 

कोट्यवधी रुपये खर्च करूनही रंगोलीला राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाणी मिळत नसल्याने स्थानिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यापूर्वी स्थानिक पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन राज्यमार्ग क्रमांक 139 काम करीत असताना फुटली सुमारे 20 ठिकाणी गळती काढूनही पाइपलाइनमधून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पर्यायाने एरंडोलीकराणा पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. याबाबत जलजन्य आजार झाल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कोणतीही हालचाल केली होती मात्र ग्रामपंचायत वारंवार पाठपुरावा केला यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी दोन ऑक्‍टोबर रोजी फुटलेल्या पाईपलाइनची पाहणी केली याबाबत पंचायत समिती अभियंता यांनी पाहणीनंतर सुमारे 17 दिवसांनी इस्टिमेट तयार करून दिले आहे. 19 ऑक्‍टोबरपासून हे इस्टिमेट जिल्हा परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रासाठी व मंजुरीसाठी अडकून पडले असून हे कधी मंजूर होणार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कधी पाईपलाईन होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

खेळ कधी संपणार ? 
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्या कागदी घोड्याचा खेळ कधी संपणार एरंडोली कराला सामने बंद असलेला पाणीपुरवठा कधी सुरू होणार असा सवाल एरंडोलीकराना पडला आहे.

पाण्याची सोय करा 

प्रशासनाने आता कागदी खेळ बंद करून जनतेच्या पाण्याची सोय करावी. 
- सुभाष साळुंके 

पाईपलाईन नवीन टाका 
राजू राजपूत कंपनीने फोडलेल्या पाईपलाईन नवीन करून पाण्याची गैरसोय थांबवावी. 
- आत्माराम जाधव, माजी उपसरपंच, एरंडोली 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pipeline repair stuck in Erandoli, the water supply was cut off even after removing the leaks in 20 places