एकाच पावसाने महामार्गावर  पडले खड्डे ; साहित्य निकृष्ट दर्जाचे... वाचा कुठे

सदाशिव पुकळे
Sunday, 12 July 2020

कराड-पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे त्यामध्ये सात मीटरची रुंदी व एक मीटरची उंची वाढवण्याचे काम जोमाने सुरू आहे.

झरे (जि. सांगली ) : कराड-पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे त्यामध्ये सात मीटरची रुंदी व एक मीटरची उंची वाढवण्याचे काम जोमाने सुरू आहे. परंतु यामध्ये लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरत असल्याची तक्रार असून याची संबंधित खात्याने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

मागील 10 ते 12 दिवसांमध्ये पाऊस पडला या पावसामध्ये अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचून खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम अजून अपूर्ण आहे. काम सुरू असतानाच रस्त्याला खड्डे पडत असतील तर कामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

एका पावसामध्ये अनेक ठिकाणी असे खड्डे पडलेले दिसत आहेत. सदर खड्डे दिसत नसल्याने वाहनधारकांना अचानक ब्रेक मारावा लागतो त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काम सुरू असतानाच रस्ता दबत असेल तुटत असेल तर तो रस्ता किती दिवस टिकेल याचाही विचार केला पाहिजे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on the highway with a single rain