400 हेक्‍टर बांधावर इतकी हजार झाडांची लागवड; या योजनेचा उपक्रम, वाचा कुठे

Planting of 80 thousand trees on a 400 hectare area; read where
Planting of 80 thousand trees on a 400 hectare area; read where

इस्लामपूर (जि . सांगली) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून तालुक्‍यातील शेताच्या बांधांवर, एकूण 400 हेक्‍टर क्षेत्रावर 80 हजार फळझाडे लागवड करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बी. एस. माने यांनी दिली. 

वाळवा तालुक्‍याचा बराचसा भाग बागायत आहे. त्यामुळे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा जास्त आहे. मुख्य पीक ऊस, सोयाबीन आहे. फळबाग लागवड करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. परंतु सामान्य शेतकऱ्याला हापूस सारखा महागडा आंबा खाणे खिशाला परवडत नाही. ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवुन शेताच्या बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात आहे.

कमीतकमी 20 गुंठे क्षेत्र असणारा शेतकरीही याचा फायदा घेऊ शकतो. त्यामध्ये 4 फळझाडांची लागवड करू शकतो. सलग मोकळे शेतीचे क्षेत्र असेल तरीसुद्धा असा या योजनेचा लाभ मिळेल. दर हेक्‍टरी 20 फळझाडांची लागवड त्याच्या बांधावर करता येईल. यासाठी शासनाचे प्रति झाड 1000 रुपये अनुदान मिळते. हे अनुदान तीन टप्प्यांत, तीन वर्षांत विभागून मिळते. या तीन वर्षांत ते फळझाड जगवणे बंधनकारक आहे. प्रत्येक वर्षी झाडाची अवस्था पाहणी करून अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत आंबा, नारळ या फळ पिकाची लागवड केली जाते. 

इच्छुकांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा

दिवसेंदिवस शेतीला शेणखताची कमतरता भासू लागली आहे. शेणखत हे वर्षभर कुजून नंतर वापरात येते. यासाठी वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून शासनाने कमी दिवसांत शेणखत निर्मितीसाठी कंपोस्ट युनिट सुरू केले आहे. फक्त तीन महिन्यात हे खत तयार होते. गांडूळ खतसुद्धा यापेक्षा कमी कालावधीत, म्हणजे फक्त दीड महिन्यात तयार होते. यासाठी कृषी विभाग एका लाभार्थ्यास एक गांडूळ व एक कंपोस्ट युनिट करीता अनुदान देत आहे. कंपोस्ट युनिट करीता एका लाभार्थ्यास 10,000 रुपये, गांडूळ युनिट करीता 12,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनात्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांनी गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. 
- बी. एस. माने, तालुका कृषी अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com