राज्यात प्लाझ्मा बॅंकही लवकरच सुरु करणार ...मंत्री अमित देशमुख

amit deshmukh.jpg
amit deshmukh.jpg

सांगली, सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर, रूग्णदर कमी आहे. रूग्ण दुपटीचा दर पंधरावड्याच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात सर्व आवश्‍यक वैद्यकीय सामग्री, औषधे, पर्यायी औषधे उपलब्ध आहेत. प्रतिकारशक्ती क्षीण असलेले रूग्ण दगावतात हे टाळण्यासाठी अशा रूग्णांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. प्लाझ्मा थेरपीची उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले आहेत. राज्यात प्लाझ्मा बॅंकही आपण सुरू करीत आहेत, अशी माहिती वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यात कोरोना अनुषांगिक उपाययोजनांची अंमलबजावणी समाधानकारक आहे, कोरोना रुग्ण व्हीडीओव्दारे संपर्क करु शकतील असेही ते म्हणाले. 

कोरोना पार्श्‍वभूमिवर वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आढावा बैठकीस सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, झेडपीचे सीईओ अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थिती होते. 

वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, कोरोना व्यतिरीक्त इतर रूग्णांना उपचारात अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्‍यक खबरदारी घेत आहोत. प्रत्येक खासगी रूग्णालयात वैद्यकीय संरक्षक सामग्री उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी सुरूवातीपासूनच नियंत्रणात ठेवले आहे. पालकमंत्री, कृषीमंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या समन्वयाने अत्यंत तत्परतेने कंटेनमेंट झोन, अन्य अनुषांगिक उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे केल्याने प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परजिल्ह्यातील, परराज्यातील लोक स्वजिल्ह्यात परतल्याने नंतरच्या काळात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला पण स्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कोरोना बाधीतांचा आकडा अन्य राज्याच्या तुलनेत जास्त असला तरी राज्यात परदेशातील एक्‍सपोजर जास्त आहे. राज्य सरकारने काळजीपूर्वक धाडसी निर्णयाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळते आहे. त्यासाठी आवश्‍यक सामग्री ऑक्‍सीजन, व्हेंटीलेटर, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. सरकार मोफत उपचार देत आहे.आवश्‍यकतेनुसार खासगी रूग्णांलयामधील बेडही कोरोना उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. 

 
मंत्री देशमुख म्हणाले... 
0 सांगलीत आधुनिक सुविधा देणार 
0 वैद्यकीय शिक्षण मागण्यांचा विचार करणार 
0 सांगलीत केमेथेरपी यंत्राबाबत तातडीने विचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com