esakal | किल्लेमच्छिंद्रगडला दुषित पाण्याने जीवीताशी खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Play with the life of Fort Machhindragad with contaminated water

किल्लेमच्छिंद्रगड : गावाने स्वबळावर विहीर खोदून पाण्याची सोय केली. ही विहीरी क्षारपड क्षेत्रात असल्याने तिचे पाणी पिण्यास योग्य नाही. गाव विहीरीची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावते.

किल्लेमच्छिंद्रगडला दुषित पाण्याने जीवीताशी खेळ

sakal_logo
By
शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : गावाने स्वबळावर विहीर खोदून पाण्याची सोय केली. ही विहीरी क्षारपड क्षेत्रात असल्याने तिचे पाणी पिण्यास योग्य नाही. गाव विहीरीची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावते. त्यावेळी कृष्णा कारखान्याच्या जलसिंचन योजनेचे पाणी विहीरीत सोडून तेच पिण्यास वापरले जाते. 

दहा वर्षाहून अधिककाळ नागरीकांना विहीरीच्या क्षारयुक्त पाण्यात मिसळलेल्या नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते. त्यातून कावीळ, मुत्राशयाचे विकाराने जनता त्रस्त झाली आहे. पिण्याच्या पाण्याची होत असलेली गावची परवड आणि अशुद्ध पाण्याने जीवीताशी होत असलेला खेळ थांबण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे. 

कंपोस्ट निर्मिती प्रकल्पामुळे भुजलातील पाणी खराब झाल्याने गाव विहीरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पास विरोध करायचा नाही, या मुद्यावर चर्चा होऊन कृष्णा कारखान्याने स्वखर्चाने जलसिंचन योजनेचे पाणी विहीरीत सोडण्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत मान्य केले. वीज बिलाचा खर्च मात्र दिलेला नाही. कृष्णा नदीतून थेट आलेले अशुद्ध पाणी आणि गावविहीरीतील क्षारयुक्त एकत्र सिळून वापरले जाऊ लागले. 

गावास उपलब्ध पाण्यामुळे गॅस्ट्रो, जुलाबाचे 10 रुग्ण, टायफाईडचे 12 रुग्ण आणि काविळीचे 15 इतके रुग्ण उपचारासाठी येतात. दिवसेंदिवस वाढ आहे. नागरीकांच्या आरोग्यासाठी पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळणे आवश्‍यक आहे.'' 
- डॉ. विजय पेठकर, शिवनगर-किल्लेमच्छिंद्रगड 

पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याचे ठरले असतानाही कृष्णा कारखान्याने अंग काढून घेतले. आरोग्यास हानीकारक कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प येत्या हंगामात सुरु करण्यास तीव्र विरोध असेल. राष्ट्रीय पेयजल योजनेतून पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागेल.'' 
- राहूल निकम, उपसरपंच, किल्लेमच्छिंद्रगड


संपादन : प्रफुल्ल सुतार