दर नाही म्हणून कलिंगडे खेळाडूंना वाटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वांगी-मातीत घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी निराश आहेत. अशावेळी हार न मानता क्रिकेट खेळणाऱ्यांची तहान कलिंगडाने भागवून शेतकऱ्याने जगावेगळा आनंद मिळवला. येथील धडपडे युवा शेतकरी सुहास माळी यांनी हा उपक्रम राबवून नाराज शेतक-यांपुढे आदर्श ठेवला.

तीन महिन्यांपूर्वी सुहास यांनी एक एकर कलिंगडाची लागवड केली. मेहनत घेत त्यांनी प्लॉट उत्कृष्ट पिकवला. फळेही भरपूर आणि तजेलदार आली. खते, औषधे, बियाणासाठी 40 हजार खर्च केला. प्लॉट काढणीला आला. त्याचवेळी बाजारात कलिंगडचे दर गडगडले. 10 हजार रुपये तोटा झाला. सुहास नाराज झाले नाहीत. 

ग्रामदैवत अंबिकादेवीची यात्रा चार दिवसांवर आली होती. कडेपूर रस्त्यालगत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उन्हाचा तडाखा आणि उपलब्ध सवळ पाण्याने तहान भागत नसल्याने खेळाडू व प्रेक्षकही कासावीस होत होते. ही तगमग पाहून सुहासने छोट्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून कलिंगड भरुन आणली. सर्व खेळाडूंना व बघायला आलेल्या मुलांना फुकट वाटली. हे वाटप त्यांनी सलग तीन दिवस करुन मनाचा मोठेपणा दाखवला.

थंडगार कलींगडे खाऊन तृप्त झालेले सर्व खेळाडू सुहास यांच्या दिलदारपणाला सलाम करीत होते. त्यांच्या शेतातील सर्व उत्पनास भविष्यात चांगला दर मिळावा, अशी दुवा देत होते. सुहास यांच्या उपक्रमाने यात्रेकरु व खेळाडू चांगलेच भारावल्याचे पहावयास मिळाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the players were given watermelon for no rate