
सांगली/कुंडल : चिखलदरा (जि. अमरावती) येथून प्रशिक्षणासाठी आलेल्या वन विभागाच्या ११० जणांच्या पथकातील तब्बल ६१ जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर कुंडल, पलूस व शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, तसेच आरोग्य विभागाने दिली आहे.