बापरे...टेंभूच्या कालव्यातून वाहत आहेत विषारी साप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लेंगरे (सांगली)- सध्या परिसरात टेंभुचे उन्हाळी आवर्तन सुरु आहे.त्यामुळे टेंभुचे कालवे तुडुंब भरुन वाहू लागले.टेंभुच्या या कालव्यातून वाहणार्या पाण्याबरोबर साप वाहून येण्याचे प्रकार वाढले आहे.टेंभुच्या कालव्यात सापाचा वावर वाढल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे शेतीला पाणी देणे जिकीरीचे बनले आहे.तरी वनविभागाकडून मोठ्या कालव्यातील सापांचा बदोबस्त करावा अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.

गावात टेंभूच्या पाण्याबरोबर मोठे साप येऊ लागले आहेत.असाच एक सुमारे बारा फुटी साप परिसरातील माहुली येथे सापडला आहे.या सापाच्या वाढत्या भ्रमंतीमुळे परिसरातील लोकांच्यात चांगलाच गोंधळ उडला आहे. हा साप चितळी रस्त्या लगतच्या टेंभुच्या कालव्यात वाहू आला होता.तेथील शेतकर्याच्या निर्दशनास आल्याने सापला बाहेर काढून वनविभागच्या हद्दीत सोडण्यात आला.हे वाहून येणारे साप कोयना धरणातून येत असल्याचा संशय लोकांच्यातूंन व्यक्त केला जात आहे.

कोरोना आपत्तीमुळे देशासह राज्यात सर्वत्र लाँकडाऊन सुरु आहे.यामुळे शहराकडील मंडळीने गड्या आपला गाव बरा म्हणत गाव गाठले आहे.सध्या भागात टेंभुचे उन्हाळी आवर्तन सुरु आहे.टेंभुचे पाणी तलाव ,ओढ्याला सोडण्यात आले आहे.ग्रामीण भागातील महिला या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी येतात.तसेच लहान मुलांचीही या ओढ्यांच्या पाण्यात खेळण्यासाठी झुंबड असते. तसेच सुट्टी, लाँकडाऊनमुळे गावी आलेले लोक या कालव्याच्या पाण्यात मुलासह पोहण्याचा आनंद लुटत आहेत.परंतु या कालव्याच्या पाण्यात विषारी सापांचा सर्रासपणे वावर वाढल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.सापांंचा कालव्यात वाढता वावर पाहून टेंभुच्या कालवा निरिक्षक अधिकारी यांनी देखील ओढा काठावर धुणे,कालव्याच्या पाण्यात पोहणे,लहान मलांना कालव्या नजीक एकटे सोडून,कालव्याजवळ जनावंरे चरण्यास सोडणे टाळावे असे आवाहन केले आहे.कालव्यात फिरणार्या या सापामुळे कोणतीही जिवीतहानी होण्याअगोदर वनविभागाने या कालव्याच्या पाण्यातील सापांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poisonous snakes are flowing through the canal of Tembu