
सांगली : मिरज शहरातील अबावली कब्ररस्तानच्या प्रवेशद्वाराजवळ गांजा विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून सुमारे ९६८ ग्रॅम गांजा, दुचाकी असा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रियाज मेहबुब सारवान (४२, रा. मंगल टॉकिजजवळ, लोणार गल्ली, मिरज) व अमन आक्रम जमादार (२१, ख्वॉजा वस्ती, मिरज) अशी त्या दोघांची नावे आहेत.