सटकलेल्या उदयनराजे समर्थकांना पोलिसांचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सातारा : फाईट या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेला तोडफोडीचा स्टंट उदयनराजे समर्थकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. चित्रपटाची फुकट प्रसिद्धी व्हावी अशी भाबडी आशा ठेऊन हा स्टंट केल्याची चर्चा साताऱ्यात रंगली परंतु आता हा स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच हिसका दिला आहे.

फाईट या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उद्यनराजेंच्या कार्यकर्त्यांनी काल चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान गाडीची तोडफोड आणि फ्लेक्स बोर्ड फाडले हा निव्वळ स्टंट असल्याचे साताऱ्यात जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्या निर्मात्यांनी सदर घटने बाबत कोणताही  गुन्हा पण दाखल नाही केला पण सातारा पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही शाहुपुरी पोलिसांनी या घटनेत सुमोटू या कायद्याचा वापर करून स्वतः गुन्हा दाखल केला या प्रकरणात जे संशयित आहेत  त्यांना शाहूपुरी पोलिसांनी 427,506,143,147,149,37(1) या कलमानुसार गुन्हा नोंद करून त्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणखी 3 आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: police arrested udayanraje supporters for stunt